आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध संपत्ती प्रकरणी आयपीएस अधिकरी व पत्नीला शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपात दोषी ठरविण्यात आले आहे. ए.के. जैन असे त्या आयपीएस अधिका-याचे नाव आहे. जैन यांनी उत्नन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा ठपका कोर्टाने त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीवरही हे आरोप ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी कोर्टाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

आयपीएस अधिका-याला अवैधरित्या संपत्ती बाळगल्या प्रकरणी दोषी ठरवले गेल्यामुळे एकूणच पोलिस विभागावर डाग लागला आहे. समाजामध्ये पोलिसांबद्दलची प्रतिमा यामुळे खालावते असे एका वरिष्ठ अधिका-याने म्हटले आहे.