आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या IPS ने रोखला होता ओबामांचा ताफा, अटलजींनी केले होते कौतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2010 साली भारतात आलेल्या ओबामांचा काफिला- फाईल फोटो (इनसेटमध्ये DGP संजीव दयाळ) - Divya Marathi
2010 साली भारतात आलेल्या ओबामांचा काफिला- फाईल फोटो (इनसेटमध्ये DGP संजीव दयाळ)
मुंबई- महाराष्ट्र पोलिस दल देशातील एक ताकदीचे पोलिस दल म्हणून देशाला परिचित आहे. पोलिस दल सक्षम आहे हे आपण तेव्हा म्हणतो जेव्हा कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबर गुन्हेगारी नियंत्रित असते. मुंबई पोलिस हे काम खुबीने बजावत आहे. आज आम्ही तुम्हाला 'महाराष्ट्र पोलिस दलाचे हिरो या सदरात एका पोलिस अधिका-याची माहिती देणार आहोत. ज्याने महाराष्ट्र पोलिस दलात भरीव कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी व डीजीपी संजीव दयाल हे त्यापैकीच एक. ओबामा जेव्हा 2010 मध्ये सर्वप्रथम भारतात आले होते तेव्हा संजीव दयाल यांनीच ओबामांच्या सुरक्षेसाठी अमेरिकी गुप्तचर संघटनेच्या अटी मानण्यास नकार दिला होता व आपल्या अटींनुसार काम करीत नसल्याने राष्ट्राध्यक्ष ओबामा आणि मिशेल यांचा काफिला रोखला होता.

मुंबईचे पोलिस आयुक्तपद भूषवले-
महाराष्ट्र पोलिस दलात डीजीपी बनण्याआधी संजीव दयाल हे मुंबईचे पोलिस आयुक्त राहिले आहेत. ते 1977 च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी मुंबईत अनेक वर्षे काम केले. त्यांनी 1982 ते 1986 पर्यंत झोन -7 चे डीसीपी होते. तसेच पश्चिम मुंबईतही अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले. ते वाहतूक विभागातही ज्वायंट सीपी (प्रशासन) म्हणून काही काळ कार्यरत होते.
पुढे वाचा, पाकिस्तानात गेल्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी यांनी केली होती दयाल यांची स्तुती...