Home »Maharashtra »Mumbai» Irish Young Girl Nude Body Found Near South Goa Beach

गोव्यात बीचवर सापडला विदेशी तरुणीचा विवस्त्र मृतदेह; स्कार्लेट हत्याकांडाच्या आठवणी ताज्या

दिव्य मराठी वेब टीम | Mar 18, 2017, 16:13 PM IST

मुंबई- गोव्यातील एका बीचवर विदेशी तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्‍यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तरुणीची ओळख पटली असून ती आयरिश असल्याचे समजते.

या प्रकरणाने गोव्यातील बहुचर्चित स्कार्लेट हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. हे प्रकरण आणि स्कार्लेट हत्याकांडाशी मिळतेजुळते आहे. ब्रिटिश तरुणी स्कार्लेटवर 19 फेब्रुवारी 2008 मध्ये बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती.

मृत तरुणीची ओळख पटली असल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले आहे. 28 वर्षांच्या या तरुणीचे नाव डेनियल मॅक्लेघिम आहे. डेनियलचा मृतदेह मंगळवारी अॅडनेम, देवबाग भागात सापडला होता. हा परिसर निर्मनुष्य आहे. पोलिस अधिकारी सॅमी टॅवोरेस म्हणाले, तरुणीच्या चेहऱ्यावर अनेक जखमा आहेत. तिच्यावर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तरुणी हत्या कशी झाली आणि बलात्कार झाला की नाही, हे सांगता येईल. घटनेची माहिती प्रशांत कोमारपंत नावाच्या एका व्यक्तीने दिली. या भागातून जात असताना त्याने तरुणीचा मृतदेह पहिल्यांदा पाहिला होता. पोलिसांनी विकास भगत नामक आरोपीला अटक केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घटनेशी संबंधित इतर फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended