आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Irragation Project Having Lots Fund So Government Demanded Governor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाडा, विदर्भातील मध्यम सिंचन प्रकल्पांसाठी राज्यपालांना साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठवाडा, विदर्भातील मध्यम सिंचन प्रकल्पांसाठी लागणा-या निधीसाठी राज्यपालांना साकडे घालण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. दरम्यान, रात्री झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच निवृत्त आमदारांचे मानधन 25 हजारांवरून 40 हजार करण्याचा निर्णयही घेण्यात आला.


विधान परिषदेत तटकरे म्हणाले, मराठवाड्याच्या हक्काचे 18 टीएमसी पाणी त्वरित मिळावे, अशी शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मराठवाड्यातील 600 हेक्टरच्या आतील सर्व प्रस्तावित प्रकल्प आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात येतील. सिंचन घोटाळ्याची चौकशी करणारी चितळे समितीची कार्यकक्षा वाढविण्याची गरज नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. यंदा चांगला पाऊस आहे. जायकवाडीत चार टीएमसी पाणी आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा या धरणांमधून येत्या चार-पाच दिवसांत 15 टी.एम.सी. पाणी सोडले जाईल. 78 हजार कोटींचा घोळ होईल कसा?.