मुंबई- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी दिलेल्या शपथपत्रात मानपूर (ता. भुसावळ) येथील शेतजमिनीचा उल्लेख केलेला नाही. प्रॉपर्टीबाबत महाजन यांनी खोटी माहिती देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक केली. त्यामुळे महाजन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान,
आपण ती जमिन परत करणार आहे. ही जमिन माझी नसून तापीपूर्णा साखर कारखान्यासाठी घेतली होती. या जमिनीसाठी पैसेही कारखान्यानेच भरले आहेत. मात्र, या कारखान्यावर माझी संचालकपदी निवड झाल्यानंतर ही जमिन नावाकर करण्यात आली. त्यामुळे आपण ती माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात देण्यासही विसरलो. ती जमिन आपण पाहिली नाही व सध्या कोण पिकवतो याचाही महिती नसल्याच महाजन यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण-
जळगाव- औरंगाबाद महामार्गावर देवपिंप्री फाट्याजवळ ही जमीन आहे. सन 2001 साली एकनाथ खडसे, गिरिश महाजन, हरिभाऊ जावळे, गुरूमुख जगवानी व इतरांनी मिळून ‘तापी पूर्णा सहकारी साखर कारखाना, मानपूर’ उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी मानपूर येथील गट क्र. 121 व 122 मधील एकूण 81 एकर जागा खरेदी केली. यातील 65 टक्के जागा एकनाथ खडसे, त्यांचे कुटूंबिय व जवळच्या नातेवाईकांच्या नावे खरेदी आहे. उरलेली जमीन इतर संचालकांच्या नावे आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या नावावर 5 एकर जमिन आहे.
आता काय स्थिती आहे?
- तुम्ही जमिनी द्या, त्याचा चांगला मोबदला देवू व तुमच्या मुलांना साखर कारखान्यात नोकरी देवू असे खडसेंनी सांगितले होते.
- गावात रोजगार येईल, गावाचे भले होत आहे म्हणून आम्ही सर्वांनी ही जमिन दिली.
- ज्या कारणासाठी ही जमिन घेतली होती त्यासाठी तिचा वापर नाही.
- 81 एकर या विस्तीर्ण जागेवर सध्या जेसीबी व पोकलँड मशिनने रात्रंदिवस सपाटीकरण केले जात आहे.
- 3 किलोमीटर लांब तलावावरून या जमिनीसाठी पाणी आणले आहे.
- आता या जमिनीचा वापर सहकारी कारणांसाठी न करता वैयक्तिकपणे सुरु केला आहे.
- त्यामुळे आमची जमिन आम्हाला परत करावी अशी येथील शेतक-यांची मागणी आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)