आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Afzal Guru\'s Death Sentence Survive To Congress Govt?

अफझल गुरुची फाशी काँग्रेसचा \'मास्टरस्ट्रोक\' ठरणार?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेवर 12 वर्षापूर्वी हल्ला करणा-या अफझल गुरुला कसाबप्रमाणे यमसदनी अखेर सरकारने धाडले. कसाबप्रमाणेच अफझलची केसही न्यायिक प्रक्रियेद्वारेच हाताळली. त्यामुळेच आज केंद्र सरकार मोठ्या खुबीने हे शब्द देशाच्या तोंडात घालत आहे. काही प्रमाणात खरे आहे ते. पण कसाबला फाशी दिल्यानंतर दोन महिन्यात सरकारने अफझला फाशी देऊन आणखी एक बॉम्बगोळा कसा काय टाकला असा प्रश्न पडू शकतो. आता त्यामागे राजकीय 'टायमिंग' नक्कीच असल्याचे दिसून येते.

गेली सात-आठ वर्षे आर्थिक-सामाजिक स्तरावर कमालीचे अपयशी ठरलेले सरकार लोकसभा निवडणुकीत काय होणार यामुळे घाबरलेले आहे. त्यातच भाजपमधील बुलंद आवाज असलेल्या मोदींच्या राष्ट्रीय राजकारणाच्या प्रवेशामुळेही काँग्रेस सरकार बिथरले आहे. त्यामुळे येत्या लोकसभेत मोदींना पर्यायाने भाजपला किमान दहशतवाद्याचा मुद्दा आणि कसाब-अफझलला मुस्लिम असल्यामुळे व मताच्या राजकारणामुळेच फाशी होत नाही, असा विषारी प्रचार करण्याचा मुद्दा तरी त्याच्या हातात द्यायचा नाही असे काँग्रेसने ठरवलेले दिसते. त्यामुळेच न्यायिक प्रक्रियेद्वारेच हे विषय हाताळलेले व संपवलेले बरे म्हणून काँग्रेसने पुढील लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याआधीच अफझलला यमसदनी पाठवले आहे. कसाब-अफझलला फाशी हे एक नक्कीच न्यायप्रक्रियेचे द्योतक आहे व यात राजकारण नाही असे समजले तरी ज्या 'टायमिंग'ला हे घडवून आणले यात नक्कीच राजकारण असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही.

मनमोहन सरकार गेल्या काही वर्षात सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचे दिसून येते. निर्णयप्रक्रिया होत नव्हती. प्रशासन हालत नसते त्यामुळे सिस्टीम 'ढीम्म' झाल्याचे दिसते. सामाजिक-आर्थिक पातळीवर देशात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे देशभर नाराजीचे व निराशाजनक चित्र आहे. देशात भ्रष्टाचार, काळा पैसा, बलात्कार, महिला सुरक्षा, गुन्हेगारी, व्यक्तिस्वातंत्र्य, सोशल नेटवर्किंग साईट यासारख्या विषयांनी मागील काळात वेगळे रुप धारण केले. वरील विषयावरुन दिसून येते की मनमोहनसिंगचे सरकार सामाजिक पातळीवरील विषय हाताळण्यात कमालीचे अपयशी ठरले आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा आर्थिक स्थितीचा आहे. मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी 1991 मध्ये नरसिंहरावांच्या काळात देशात जागतिकीकरणाला अनुकुल अर्थव्यवस्था बनविली व पुढे त्याचे देशाला फायदेही मिळाले. पण मनमोहनसिंग हे 2004 मध्ये स्वत: जेव्हा पंतप्रधान झाले. त्यानंतर मात्र त्यांनी देशात आर्थिक सुधारणा सोडा पण आधुनिक अर्थव्यवस्थेला सुसंगत धोरणही राबवले नाही. आता त्याचा फटका देशातील अर्थव्यवस्थेला बसला आहे, बसू लागला आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर पाच टक्क्यांपेक्षा खाली राहील असे अंदाज व भाकीते या क्षेत्रातील मंडळी वर्तवत आहेत. देशातील आर्थिक घसरणीमुळे मनमोहन सिंग कमालीचे हादरले आहे. त्यातच सरकारचा बहुतांश वेळ देशातील सामाजिक स्थिती व शेजारील राष्ट्रे यामुळे तयार होणा-या समस्या सोडवण्यात चालला आहे.

आता लोकसभा निवडणुका 14 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आर्थिक-सामाजिक पातळीवरील मुद्दे आता मनमोहन सरकारच्या विरोधात जात आहेत. त्यातच विरोधी पक्ष भाजपकडून नरेंद्र मोदींचे कसलेले नेतृत्त्व पुढे येत आहे. त्यामुळे काँग्रेस कमालीची धास्तावली आहे. दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधील मोदींच्या भाषणानंतर तर काँग्रेस बिथरली असल्याचे दिसते. भारतातील मुस्लिमांची व त्यांच्या मानसिकतेची 'केस स्टडी'चे उदाहरण म्हणून पाहत दोन महिन्यांपूर्वीच कसाबला फाशी दिले होते. त्यानंतर देशातील मुस्लिमांनी व त्यांच्या संघटनांनी कसाबच्या फाशीचे स्वागत करीत जो दोषी आहे, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षाही होणारच, असे सांगत इस्लामला हिंसा कबूल नसल्याचे ठणकावून सांगितले होते. त्याचवेळी काँग्रेस थोडी आश्वासक झाली. त्यानंतर काँग्रेसने विरोधकांना येत्या निवडणुकीत अफझलचा मुद्दा द्यायचा नाही ठरवत रणनिती तयार केल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अफझल गुरु हा भारतीय नागरिक असल्यामुळे कसाबप्रमाणे या प्रकरणाकडे पाहता येत नव्हते. कारण अफझलला फाशी दिल्यानंतर काश्मीरमधील लोक फुटीरवाद्यांकडे झुकतील की काय अशी शंका सरकारला होती. मात्र, मागील काही दिवसात राजकीय स्थिती झपाट्याने बदलत चालली असल्याचे दिसते. मोदी आता विकासपुरुष म्हणून आपली प्रतिमा बनवत देशाचे नेतृत्त्व करु इच्छित आहेत. तसेच सध्यातरी मोदींना अनुकूल असे घडत असल्याचे चित्र आहे. राजनाथ सिंगांना भाजपने पक्षाध्यक्ष करताच भाजप हिंदुत्ववादाचे कार्ड (विशेषत उत्तर भारतात) पुन्हा वाजविणार असे दिसताच देशातील सामान्यांची (हिंदू) सहानुभूती मिळवण्याचा हा काँग्रेसचा शेवटचा व महत्त्वाचा डाव आहे. भाजपचे जे काही मुद्दे आहेत त्यापैकी अफझल गुरुचा एक होता. मात्र आता मुद्दा काँग्रेसने संपविला असून त्यांच्यासाठी तो मास्टरस्ट्रोक ठरेल की नाही हे येत्या काही काळात कळेलच!


अफझलला अल्लाला प्यारे करण्यामागे 'काँग्रेसनिती' काय आहे वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...


ajay.gorad@dainikbhaskar.com