आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2019 साली अजित पवार राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- 2019 साली महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होणार आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येईल तर अजित पवार त्याचे प्रमुख असतील असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे अहमदनगरमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, धनजंय मुंडेंच्या दाव्यानंतर अजित पवार हे 2019 साली राज्यात होणा-या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा चेहरा असतील अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
 
आमदार धनजंय मुंडे हे अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या शाखेच्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळी मुंडे यांनी भाजप सरकार टीकास्त्र सोडले व 2019 साली राज्यात मोठे परिवर्तन होऊन राष्ट्रवादी सत्तेवर येईल असा दावा केला.
 
धनजंय मुंडे म्हणाले, भाजप सरकार सत्तेत थापा मारून व लोकांना मोठमोठी आश्वासन देऊन आले आहे. लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविले त्यामुळे राज्यात व देशात भाजप सत्तेवर आला. मात्र, लोकांना आता या दोन्ही सरकारचे खरे रंग दिसू लागले आहेत. आमच्या नेत्यांवर मोठंमोठे भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. मात्र, केंद्रात व राज्यात यांचे सरकार असतानाही आमच्या नेत्यावरील ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत. आमच्याविरोधात फक्त वातावरण तापवून भाजपने सत्ता हस्तगत गेली. मात्र, जनतेला हे सारं कळतं असं सांगत मुंडे यांनी 2019 साली राष्ट्रवादी सत्तेत येईल व त्याचे प्रमुख अजित पवार असतील असे सांगून टाकले.
 
अजित पवार राष्ट्रवादीचा खरंच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतात का?
 
धनंजय मुंडे यांच्या सत्ता परिवर्तनाच्या दाव्यानंतर अजित पवार खरोखरच राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होऊ शकतात याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांची राज्य सांभाळण्याची क्षमता आहे का? किंवा राष्ट्रवादी 2019 विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरू शकेल का यावर ही चर्चा येऊन ठेपली आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, राष्ट्रवादी पक्ष क्रमांक 4 वरून क्रमांक 1 चा होऊ शकतो का?....
बातम्या आणखी आहेत...