आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IS May Target J K, UP, Maharashtra, Bengal And Assam, Says Home Ministry

सावधान, महाराष्ट्रासह पाच राज्ये इसिसच्या रडारवर, केंद्र सरकारकडून अर्लट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल आणि आसाम ही पाच राज्ये इस्लामिक स्टेट (इसिस)या दहशतवाद संघटनेच्या रडारवर आहेत. त्‍यामुळे केंद्र सरकारकडून या राज्‍यांना खबरदारीच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.
या बाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, इसिसमुळे असलेल्या धोक्याबाबत भारत सजग आहे. इसिस हा केवळ एखाद्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच धोका आहे. दरम्यान, इसिसचा भारताला मोठा धोका असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अॅडव्हायझरीमध्ये मान्य करण्यात आले आहे. इसिस इराक सिरियाबाहेर पसरत असून, भारतातील महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि चार महानगरे इसिसच्या रडारवर असल्याचे त्यात म्हटले आहे. याबाबत राजनाथ सिंह म्हणाले, इसिसपासून संपूर्ण जगाला धोका आहे. भारतीय गुप्तहेर संस्था त्या धोक्यापासून सजग आहे, असे राजनाथ म्हणाले.

पुढे वाचा, ‘इसिस’ला कोणते देश करतात मदत