आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IS Return Areeb Majid Want Mahatma Gandh Biography

‘आयएस' रिटर्न मजिदने मागितली महात्मा गांधींची आत्मकथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसमध्ये सहभागी होऊन मुंबईत परतलेल्या व सध्या तुरुंगात असलेल्या अरिब मजिद याने महात्मा गांधीजींची आत्मकथा ‘सत्य के साथ मेरे प्रयोग' वाचनासाठी मागितली आहे. या शिवाय माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे पुस्तक ‘फोर्ज युवर फ्यूचर' व काही अभियांत्रिकीची पुस्तके वाचण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अरिबने कुराणची मागणी केली होती. त्याची प्रत उपलब्ध करून देण्यात आली. न्यायालयाने अरिबच्या न्यायालयीन कोठडीत २८ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.

अरीब मजीद हा कल्याण येथील तरुण असून तो सध्या तुरुंगात आहे. आयएस संघटनेसाठी काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.