आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Right To Live Pradnya Singh? High Court Ask Government

प्रज्ञासिंह जिवंत राहावी की नाही ? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘मालेगाव येथे 2008 मध्ये बॉम्बस्फोट घडवल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असणा-या साध्वी प्रज्ञासिंहला मानवतवादी दृष्टिकोनातून जामीन का देत नाही’, अशी विचारणा शुक्रवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. राज्य सरकारला साध्वी जिवंत राहणे अपेक्षित आहे अथवा नाही, असाही सवाल करण्यात आला. प्रज्ञासिंहच्या जामिनाविषयी 28 जानेवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.तुरुंगात असणारी प्रज्ञासिंह कॅन्सरच्या विकाराने ग्रस्त आहे. आपल्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात जाण्याकरिता जामीन मिळावा यासाठी प्रज्ञासिंहने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्याला पोलिसांनी विरोध केला आहे.

उपचारासाठी हवा जामीन
कर्करोगाने त्रस्त असलेल्या प्रज्ञासिंहने ‘आपल्याला राज्य सरकारकडून व्यवस्थित उपचार मिळणार नाहीत. त्यामुळे आपल्याला विश्वासार्ह वाटणा-या रुग्णालयात उपचार घेता यावेत, यासाठी आपली जामिनावर मुक्तता करावी’, अशी मागणी वकील महेश जेठमलानी यांच्यामार्फत न्यायालयात केली आहे. न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर तिच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी साध्वीच्या जामीन अर्जावर मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करण्यात यावा, असे निर्देश
राज्य सरकारला दिले.