आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISA Officer Transfer News In Maharashtra, Mumbai, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदल्यांचा पोरखेळ सुरूच; राधाकृष्णन यांची आठ दिवसात तिसर्‍यांदा बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या पोरखेळाची ‘परंपरा’ कायम ठेवत राज्य सरकारने शुक्रवारी पुन्हा सात सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. विशेष म्हणजे गेल्या दहा दिवसात तीनदा बदली झालेले बी. राधाकृष्णन यांची आता रत्नागिरीच्या तर ए. रंगा नाईक यांची जालना जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.

जालन्याचे ‘सीईओ’ असलेले राधाकृष्णन यांची आठवडाभरापूर्वी नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली होती. चारच दिवसांत त्यांना उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले. नगरच्या जिल्हाधिकारीपदी आठवड्यापूर्वी आलेल्या रुबल अग्रवाल आता जळगावच्या जिल्हाधिकारी असतील. सनदी अधिकारी रुजूही होत नाहीत तोवर निर्णय बदलले जात आहेत.