आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isharat Jaha Encounter Case: Firing On Ishrat Mother

इशरत जहाँच्या आईवर मुंब्र्यात गोळीबार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इशरत जहाँ चकमक प्रकरणातील सुनावणीला विलंब व्हावा यासाठी माझ्यावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप इशरतची आई शमीमा कौसर यांनी केला आहे. गुजरात उच्च न्यायालयातील सुनावणी आटोपून परत येताच कौसर यांच्या मोटारीवर मंगळवारी मुंब्रा येथे गोळीबार झाला होता.

मुंब्रा येथील इशरत जहॉ आणि तिच्या तीन साथीदारांना गुजरात पोलिसांनी 15 जून 2004 रोजी चकमकीत ठार केले होते. नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी हे चौघे आल्याचा गुजरात पोलिसांचा आरोप आहे. आपली मुलगी निर्दोष असून तिला खोट्या चकमकीत मारल्याबाबतची याचिका इशरतच्या कुटुंबियांनी गुजरात उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आर. आर. वर्मा अध्यक्ष असलेली ‘एसआयटी’ तपास करत आहे. माय मुंब्रा फौंडेशन या संस्थेने इशरत जहाँ प्रकरण 9 वर्षे विविध मार्गानी न्यायालयात लावून धरले आहे. गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्याच्या कामासाठी इशरतची आई, मुंब्रा फौडेशनचे अब्दुल रौफ लाला, मुन्ना साहील सोमवारी अहमदाबादला गेले होते. कामकाज आटोपून मुंब्रा येथे परत येत असताना मंगळवारी रात्री त्यांच्या मोटारीवर गोळीबार झाला.