आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इसीस’शी संबंधित आरिब मजिदवर आरोप निश्चित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘इसिस’ या अांतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी गेलेल्या आणि पुन्हा भारतात परतलेल्या आरिब मजिदवर गुरूवारी विशेष एनआयए न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. तर आरिबसह इराकला गेलेल्या सहीम तानकी, फहाद शेख आणि अमन तांडेल या कल्याणच्याच तीन तरुणांना विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. या प्रकरणी जर आरिब मजिदला शिक्षा झाली तर इसिसशी संबंध असल्याच्या आरोपाखाली भारतात शिक्षा झालेले हे पहिलेच प्रकरण ठरेल.  
 
कल्याण येथे राहणारे आरिब मजिद आणि त्याचे तीन मित्र २५ मे २०१४ रोजी मुंबईतील दि ट्रव्हल इंडीया या कंपनीमार्फत इराकला गेले होते. त्यासाठी त्यांनी २ लाख ३७ हजार ५०० रुपये खर्च केले होते. घरातून निघण्यापूर्वी आरिबने एक पत्र लिहून ठेवले होते. त्यानुसार आपण आपल्या तीन मित्रांसोबत इसिस या संघटनेसोबत काम करण्यासाठी इराकला जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. एका सोशल नेटवर्कींग साईटच्या माध्यामातून आपण इसिसच्या संपर्कात आल्याचे आरिबने तपासात सांगितले होते. तर आॅगस्ट २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधी दरम्यान झालेल्या विविध कारवायांमध्ये तीन वेळा जखमी झाल्याने आरिबने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी इस्तंबूल येथील भारतीय दूतावासात जाऊन आपण भारतीय असून आपला पासपोर्ट हरवल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर इस्तंबूल येथील दूतावासाने आरिबला तुर्किश एअर लाईन्सद्वारे भारतात रवाना करत त्याबाबतची माहिती भारत सरकारला दिली. आरिब मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली. तर त्याच्यासोबत गेलेले फहाद शेख, सहीम तानकी आणि अमन तांडेल हे अजूनही इराकमध्येच असून त्यापैकी काहींचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
 
११४ साक्षीदारांचा समावेश
मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात ३१ मे २०१५ रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात मजिदवर दहशतवादी कारवायांसाठी दहशतवादी संघटनेसाेबत काम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तब्बल ८ हजार ५०० पानांचे हे आरोपपत्र सात भागात असून त्यामध्ये ११४ साक्षीदारांचा समावेश ‘एनअायए’च्या तपास पथकाकडून करण्यात अालेला आहे.
बातम्या आणखी आहेत...