आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Pay Tribute To Mumbai Youth Arif Ejaz Majeed

\'ISIS\'साठी लढताना इराकमध्ये ठार झालेल्या आरिफला \'जिहादीं\'नी वाहिली श्रद्धांजली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- 'अंसार-उल-तौहीद' या दहशतवादी संघटनेने कल्याणमधील आरिफ माजिदला शहीद संबोधित श्रद्धांजली वाहिली आहे.)
मुंबई- कल्याणमध्ये राहणारा युवक आरिफ एजाज माजिदच्या मृत्यूनंतर 'अंसार-उल-तौहीद' या जिहादी ग्रुपने 23 वर्षीय इंजिनियरिंग स्टूडेंट आरिफला श्रद्धांजली वाहिली आहे. मागील आठवड्यात इराकमध्ये दहशतवादी कारवायात सामील झालेल्या आरिफचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या सहका-याने दिली होती.

ट्विटरवरून वाहिली श्रद्धांजली- इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्सप्रेस'च्या माहितीनुसार, अंसार-उल-तौहीद या दहशतवादी संघटनेने आरिफला ऑनलाईन श्रद्धांजली वाहत त्याचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यात म्हटले आहे की, 'जो जन्नतची तलाश करत होता तो आहे 'शहीद आरिफ मजिद रहमत अल्ला'। ही पोस्ट अंसार-उल-तौहीदच्या ट्विटर अकाऊंटवरून पाठवली आहे.

उर्दू भाषेत लिहला संदेश- उर्दू भाषेत लिहलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की,' आम्हाला वरच्या (अल्ला)चे काम पूर्ण करण्याचे काम दिले आहे. त्यासाठी अशा कुर्बान्या द्याव्या लागतील. आपले बलिदानच आपल्याला यश मिळवून देईल. या पोस्टमध्ये आरिफला शहीद असे संबोधले आहे. आरिफचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. आरिफच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबियांनीही त्यांचा अंत्यविधी केला होता.

कोण आहे अंसार-उल-तौहीद संघटना?- अंसार-उल-तौहीद ही जिहादी विचाराची व दहशतवादी कारवायात गुंतलेली भारतातील सर्वात सक्रिय संघटना आहे. ही संघटना आपल्या उद्दिष्टांसाठी जे जे युवक सहभागी होतात त्यांना प्रशिक्षण देते तसेच त्यासाठीचे व्हिडिओ व फोटो ऑनलाईन पोस्ट करते. या युवकांना पाकिस्तानच्या उत्तरी वझीरिस्तान आणि दक्षिणी अफगानिस्तानात प्रशिक्षण देण्यात येते. या संघटनेने सध्या इराक-सिरीया वांशिक लढ्यावेळी हिंदी, तमिळ आणि उर्दू मध्ये आयएसआयएस प्रमुखाचा संदेश पाठवला होता.
पुढे आणखी वाचा, आरिफच्या मृत्यूबाबत...