आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Terrorist In NIA Custody Till 22 December In Mumbai

'ISIS'कडून लढताना सीरियाच्या लष्करावर आरिफने केला होता आत्मघाती हल्ला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘ISIS’ने आपल्याला आत्मघाती हल्ल्याचे ट्रेनिंग दिले हेाते. या ट्रेनिंगनंतर आपण सीरियाच्या सेनेवर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो अयशस्वी ठरला असा खुलासा इराक-सीरियात ISISकडून दहशतवादी हल्ला करण्यासाठी गेलेल्या कल्याणच्या आरीफ माजीद याने केला आहे. दरम्यान, आरिफला 22 डिसेंबरपर्यंत एनआयएची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
इराकमधील ‘ISIS’ या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या अरीफ माजीदला 28 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. आरिफ सध्या ‘एनआयए’ म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे. याप्रकरणी सोमवारी आरिफला कोर्टात सादर करण्यात आले. कोर्टाने त्याला 22 डिसेंबरपर्यंत एनआयएच्या रिमांडवर पाठविण्याचे आदेश एनआयए कोर्टाचे विशेष न्यायाधिशांनी दिले आहेत. त्यात्पूर्वी एनआयएने आरीफच्या चौकशीतून मिळविलेल्या माहितीचा ‘डाटा’च कोर्टात सादर केला.
एनआयएने कोर्टात सांगितले की, आरीफकडून आम्हाला अनेक धक्कादायक माहिती मिळत आहेत. तपासात नवनवीन माहिती उघड होत आहे. काही ऑनलाइन डाटा आम्ही मिळवला असून अद्यापही काही डाटा मिळवणे बाकी आहे. या ‘डाटा’ची खातरजमा करण्यासाठी आरीफला सर्व्हिस प्रोव्हायडरसमोर हजर करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या एनआयए कोठडीत वाढ करावी, अशी विनंती राष्ट्रीय तपास यंत्रणेने केली. ती कोर्टाने मान्य केली.
आरिफने एनआयएला चौकशीदरम्यान सांगितले आहे की, आत्मघाती हल्ला करण्याच्या उद्देशानेच मी ‘ISIS’मध्ये सामील झालो होतो. सामील झाल्याबाबत मला कसलाही पश्‍चात्ताप नाही, उलट मला अभिमान वाटतो. मात्र आईवडिलांच्या हट्टापायीच मी पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. ‘ISIS’ने आपल्याला आत्मघाती हल्ल्याचे ट्रेनिंग दिले हेाते. या ट्रेनिंगनंतर आपण सीरियाच्या सेनेवर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्या घटनेत आपण जखमी झालो होतो. त्या जखमेवर उपचार करण्यासाठीच आपण इराकमधून तुर्कीला रवाना झालो होतो व तेथून कुटुंबियांशी संपर्क साधला. तेथून भारतात परत आलो.