आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Terrorist Organization News In Divya Marathi

युवकांना \'इसिस\'च्या जाळ्यात ओढण्‍याची संशयित मुद्दबीरकडे होती जबाबदारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- ठाण्याचे उपनगर मुंब्रा शहरात सुमारे ८० टक्के मुस्लिम लोकवस्ती. एकेकाळी जहाज बांधणी उद्योगासाठी नावाजलेले शहर अलीकडे अनधिकृत बांधकाम आणि गुन्हेगारीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या अमृतनगर परिसरात मुख्य रस्त्यापासून थोड्या आतील बाजूला एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या इमारतींच्या गर्दीतील एक इमारत गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर अाली. रेश्मा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चौथ्या मजल्यावरील घर क्रमांक ४०४ मधून 'इसिस' संघटनेशी संबंधित असलेल्या मुद्दबीर मुश्ताक शेख याला ताब्यात घेण्यात आले.
मुद्दबीर या ३५ वर्षीय पदवीधर तरुणावर गेल्या सहा महिन्यांपासून एटीएसची नजर होती. ठाण्यातील एका महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर मुद्दबीरने संगणकीय प्रशिक्षणही पूर्ण केले होते. गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्सवरून इसिसशी संबंधित मजकूर प्रसारित केल्यामुळे तो तपास यंत्रणांच्या नजरेत आला. त्यामुळे खबऱ्यांच्या सहाय्याने त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. एटीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुद्दबीर हा बेरोजगार असून इंटरनेटच्या माध्यमातून त्याने सिरियातील इसिसशी संबंधित काही लोकांशी थेट संपर्क केला होता. आसपासच्या परिसरातील तरुणांना इसिसच्या जाळ्यात अोढून त्यांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. त्या अनुषंगाने या प्रकरणी आता अधिक चौकशी सुरू असून मुद्दबीरच्या संपर्कात या परिसरातील आणखी कोणकोण आहेत याचाही तपास केला जात आहे.
मुद्दबीरची पत्नी उजमा शेख म्हणाली, 'तो गेली दोन वर्षे घरातूनच संगणकावर काम करताे. काय काम करतो हे आपल्याला माहित नाही. गेली चार वर्षे हे कुटुंब या परिसरात वास्तव्यास आहे. गुरुवारी मध्यरात्री १० ते १२ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, त्याचा संगणक, मोबाईल आणि मुद्दबीरच्या कामाशी संबंधित काही कागदपत्रेही या पथकाने जप्त केल्याची माहिती उजमा हिने स्थानिक माध्यमांना दिली.