आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईमंदिर उडवण्याची इसिसची धमकी, जळगाव जिल्ह्याधिकारी कार्यालयास पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेने शिर्डीतील साईबाबा मंदिर उडवण्याची कथितरीत्या धमकी दिली आहे. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या शुक्रवारी हे पत्र मिळाले. साईमंदिरासह राज्यातील जळगाव, मलकापूर, भुसावळ, आणि अमरावती या चार रेल्वे स्थानकांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच शेगावचे गजानन महाराज मंदिर व तेथील न्यायालय उडवून देण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिन जवळ आल्याने राज्यभर दक्षतेचा इशारा देण्यात आला असून इसिसशी संबंधित तरुणांना झालेली अटक आणि काही तरुण इसिसमध्ये सहभागी झाल्याच्या सततच्या वृत्तांमुळे पोलिस खाते या पार्श्वभूमीवर अत्यंत सतर्क झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...