आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कल्याणमधील आयएसचा हस्तक सिरियामध्ये ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २०१४ मध्ये आयएसमध्ये भरती होण्यासाठी गेलेला कल्याणचा अमन नईम तांडेल हा तरुण सिरियात ठार झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. त्याच्यासोबत अन्य तिघे आयएसच्या बाजूने लढण्यासाठी गेले हाेते.

शनिवारी रात्री अनोळखी क्रमांकावरून अमनचे वडील नईम तांडेल यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून ही माहिती देण्यात आली. या वर्षाच्या प्रारंभी आयएसआयएसने जारी केलेल्या व्हिडिअोत अमन व अन्य काही तरुणांनी काश्मीर, गुजरात व मुजफ्फरपूरमधील मुस्लिमांच्या हत्येचा सूड घेणार असल्याचे म्हटले होते. अमन गेल्या वर्षअखेरपर्यंत कुटुंबियांशी संपर्कात होता,असे सांगण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...