आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इसिस’च्‍या एका अतिरेक्याला दरमहा मिळतो 1 लाख 80 हजार रुपये पगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्‍या रडारवर आता महाराष्‍ट्रही असल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. इसिसचा भारताला मोठा धोका असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अॅडव्हायझरीमध्ये मान्य करण्यात आले आहे. इसिस इराक सिरियाबाहेर पसरत असून महाराष्ट्रासह इतरही पाच राज्ये आणि चार महानगरे इसिसच्या रडारवर असल्याचे त्यात म्हटले आहे. याबाबत राजनाथ सिंह म्हणाले, इसिसच्‍या धोक्‍यापासून भारतीय गुप्तहेर संस्था सजग आहे.
सेंट्रल बँकेतून लुटले होते 2 हजार 574 कोटी रुपये
इस्लामिक स्टेट ऑफ ग्रेटर इराक अ‍ॅन्ड सिरीया’ किंवा ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण जगाला धोका आहे. इसिस ही जगातील सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना आहे. ‘इसिस’ने ‘मोसूल′ या इराकमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहराचा ताबा घेतल्यानंतर तेथील सेंट्रल बॅँकमधून 429 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 2 हजार 574 कोटी रुपयांची लूट केली. ‘इसिस’ला जॉर्डन, सीरिया व सौदी अरेबियामधल्या समर्थकाकडून मोठी फंडींग होत असल्याचे अमेरिकेतल्या ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन’ या संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, कशी उभी राहिली ही दहशतवादी संघटना..