आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISRO Mars Orbiter Mission Tweets Farewell Message On K Radhakrishnan's Retirement

मंगळयानाच्या यशानंतर आता मानवाला अंतराळात पाठवण्याचे इस्रोचे आगामी उद्दिष्ट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मंगळयानाच्या यशानंतर आता मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तंत्रज्ञान विकसित करत आहे, अशी माहिती इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. राधाकृष्णन यांनी शनिवारी दिली.
भारतीय विज्ञान परिषदेच्या 102 व्या अधिवेशनात बातचीत करताना डॉ. राधाकृष्णन म्हणाले की, अंतराळात रोबो पाठवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आता मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. त्यासाठी अंतराळवीरांना वातावरण आणि जीवनरक्षक प्रणाली पुरवण्याच्या क्षमतेचा विकास, अपयशाचा दर कमी करणे आणि बचाव प्रणालीचा विकास या बाबी साध्य कराव्या लागतील. इस्रो त्यावर काम करत आहे. मंगळयानाच्या निष्कर्षांबाबत आताच काही सांगणे घाईचे ठरेल.