आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक वादाच्या भोवऱ्यात, महापौर बंगल्याचाच अट्टहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांचा अट्टहास. न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारी बंगले स्मारकात रूपांतर करू नयेत, अशी केंद्राची अधिसूचना आहे. त्याचबरोबर हा बंगला ऐतिहासिक वास्तूंच्या वर्गात मोडत असून ती जागा सीआरझेडमध्ये येते, याची पूर्वसूचना मुंबई महानगरपालिकेने शिवेसेनेला दिली होती. महापौर बंगल्याऐवजी त्या शेजारी असलेल्या पालिका जिमखान्याच्या जागेचा पर्याय अधिकाऱ्यांनी शिवसेनेला सुचवला होता. परंतु शिवसेना नेत्यांनी महापौर बंगल्याच्या जागेचा हट्ट धरल्याने त्यावर मुख्यमंत्र्यांना शिक्कामोर्तब करावे लागले, अशी माहिती आता समोर आली आहे.
स्मारकासाठी गेली तीन वर्षे जागेचा शोध सुरू होता. बाळासाहेबांच्या तिसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा घोषित केली. मात्र, ही जागा घोषित करताच सरकारचा निर्णय कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. स्मारकाच्या जागेचा शोध घेण्यासाठी सरकारने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने पालिकेची उपसमिती स्थापन केली. त्यानुसार पालिकेने लोअर परेल येथील शक्ती मिल, शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या उत्तरेकडील व जिमखान्याची जागा, माझगाव येथील टेक्स्टाइल म्युझियमसाठी आरक्षित असलेली जमीन, वडाळा येथील खार जमीन, नायगाव येथील बॉम्बे डाइंगची जागा, हाफकिन अशा सात जागा निवडण्यात आल्या होत्या आणि या जागांचा पर्याय शिवसेनेला दिला होता.

यानुसार शिवसेनेच्या नेत्यांनी शक्ती मिल, बॉम्बे डाइंग, वडाळ्याची खार जमीन इत्यादी जागांची पाहणी केली होती. परंतु २३ मार्च २०१५ रोजी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी महापौर बंगल्याचा आग्रह धरल्याची माहिती एका सनदी अधिकाऱ्याने दिली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे दुसरा पर्याय...