आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘केईएम’मध्ये तीन डॉक्टरांना मारहाण; सलग दुसऱ्या दिवशी संप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांना सळई, स्टूलने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. डॉ. सुहास चौधरी, डॉ. कुशल आणि डॉ. पुनीत अशी जखमी डॉक्टरांची नावे आहेत. दरम्‍यान, या प्रकरणातील दोन आरोपींना आज (शनिवार) जामीन मंजूर झाला असून, सलग दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. सध्या मुंबईत डेंग्यू आणि इतर संसर्गजन्य आजारांची साथ सुरू आहे.
पालिकेच्या केईएम रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल आहेत. एका मुलीच्या नातेवाइकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत डॉक्टरांना बेदम मारहाण केली. दरम्यान, डॉक्टरांच्या आंदोलनानंतर रुग्णांचे खूप हाल होत आहेत. यापूर्वीही अनेकदा केईएमच्या डॉक्टरांना मारहाण झाली आहे.