आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांनी बनावट नोटांबद्दल काय करावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील बनावट नोटांच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी काय करावे? संबंधित मंत्रालयास प्रतिवादी करावे म्हणून याचिकेत उल्लेख करता आला असता. अशा निरर्थक जनहित याचिकांची दखल घेतली जाऊ शकत नाही, अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यास सुनावले.

मनोरंजन रॉय यांनी बनावट नोटांप्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्या. व्ही. एम. कानडे व रेवती मोहिते यांनी अत्यंत कठोर भाषेत याचिकाकर्त्याची कानउघाडणी केली. "ते देशाचे पंतप्रधान आहेत, काँग्रेस किंवा भाजपचे नेते नाहीत. अशा जनहित याचिका केवळ त्रास देण्यासाठी दाखल केल्या जातात,' असे मतही न्यायालयाने मांडले.

१० लाख अनामत भरा
आपली सत्यता व प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी १० लाख रुपये अनामत रक्कम जमा करा. तरच याचिकेवर आम्ही सुनावणी करू, असेही न्यायाधीशांनी सुनावले. यावर रॉय यांच्या वकिलांनी एवढी रक्कम जमा करण्यास असमर्थता दर्शवली. नंतर न्यायालयाने सुनावणीसाठी २ फेब्रुवारी ही तारीख दिली.