आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारवर नामुष्की, वर्सोव्यातील हेमामालिनींना दिलेला भूखंड परत घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपच्या खासदार हेमामालिनी यांना नियमबाह्य पद्धतीने अंधेरीतील कोट्यवधींचा भूखंड नाममात्र किंमतीत दिल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच हेमा मालिनी यांना वर्सोवा भागात यापूर्वी दिलेला भूखंड परत घेण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

हेमामालिनी यांच्या नाट्यविहार कला केंद्र या विश्वस्त संस्थेसाठी अंधेरीतच्या अांबोलीतील उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडापैकी दोन हजार चौरस फूटाचा भूखंड अवघ्या ७० हजार रुपयांत दिल्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे सरकारने आता हेमामालिनींना वर्सोवा भागात यापूर्वी दिलेला भूखंड परत घेऊन तो उद्यानासाठी आरक्षित करण्याचे निर्देश वन व महसूल विभागाला दिल्याचे खडसे म्हणाले. तर हेमामालिनींना भूखंड देताना प्रक्रियेचे पालनच केले नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.
अद्याप मूल्यांकन बाकी
महसूल विभागाने आंबोलीतील भूखंडाचे मूल्यांकन करून अद्यापही किंमत ठरवलेली नाही. भूखंडाची किंमत ठरण्याआधीच तो हेमा मालिनींना दिल्याचे उघड झाले आहे. आंबोलीतील भूखंड देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र या भूखंडाची किंमत अद्याप निश्चित करायची आहे, असे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने म्हणाले.