आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अांबेडकरांच्या स्मारकाला अनुयायांचाच विरोध, ३६० फूट पुतळ्याचा हट्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दादरची इंदू मिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी हस्तांतरित झाली, स्मारकाचा आराखडा बनला, पायाभरणी समारंभही पार पडला. मात्र, स्मारकाचा वाद संपायला तयार नाही. स्मारकाच्या आराखड्यात बदल करावा, अशी मागणी करणारी हजारो पत्रे आंबेडकरी अनुयायांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) पाठवली अाहेत. त्याबरोबरच स्मारकात बाबासाहेबांचा ३६० फूट पुतळ्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने महापरिनिर्वाणदिनाच्या तोंडावर राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
बाबासाहेबांच्या स्मारकाची जबाबदारी ‘एमएमआरडीए’कडे आहे. या प्राधिकरणाने जागतिक पातळीवर आराखड्याची स्पर्धा घेऊन मुंबईच्या शशी प्रभू यांचा आराखडा निश्चित केला. ८० टक्के मोकळी जागा असलेल्या आणि जगातील भव्य स्तूप असलेल्या प्रभू यांच्या आराखड्याचे पंतप्रधान मोदी यांनीही कौतुक केले आहे. मात्र बाबासाहेबांचे नातू व माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे
धाकटे बंधू आनंदराज यांना मात्र हा आराखडा पसंत नाही.
हा आराखडा स्मारक नसून दादरच्या नागरिकांसाठी जाॅगिंग पार्क बनवले आहे, असा त्यांचा अाक्षेप अाहे. परिणामी आंबेडकरी अनुयायी स्मारकाच्या आराखड्यात बदल करण्याची मागणी करत आहेत. ११ ऑक्टोबरला पंतप्रधानांनी भूमिपूजन करताच प्रभू यांचा आराखडा जगासमोर आला. त्यानंतर आराखड्यात बदल करावा अशी मागणी होऊ लागली. या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांनी एमएमआरडीएकडे हजारो पत्रे पाठवली आहेत.

धक्कादायक म्हणजे एमएमआरडीएने ही सर्व पत्रे शशी प्रभू यांच्याकडे पाठवली अाहेत. स्मारकात भिक्कूंच्या राहण्याची सोय असावी, स्तूपाची प्रतिकृती बंदिस्त असावी, जगात सर्वाधिक उंचीचा बाबासाहेबांचा पुतळा बसवावा, इमारती कमळाच्या आकारात असाव्यात अशा नाना तऱ्हेच्या मागण्या एमएमआरडीला पाठवलेल्या पत्रात आंबेडकर प्रेमींनी केलेल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी वाढणार सराकारची डोकेदुखी... काय म्हणतायेत मुख्य मंत्री... वास्तुविशारद शशी प्रभू काय म्हणताये... आनंदराज आंबेडकरांनी काय दिली इशारा...