आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा महिन्याभरात, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पत्रकारांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब असून पत्रकारांना संपूर्ण संरक्षण देण्यासाठी व हल्लेखोरांवर कठोर कारवाई होण्यासाठी येत्या महिनाभरात पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचे प्रारूप (मसुदा) तयार करून अध्यादेश काढला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. राज्यात गेल्या तीन वर्षांत सुमारे २६५ पत्रकारांवर हल्ले झाले असून काही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाले अाहेत. यासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, डाॅ. नीलम गोऱ्हे, सुनील तटकरे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर शिंदे म्हणाले की, तीन वर्षांत ७७ पत्रकारांवर हल्ले झाल्याच्या नोंदी आहेत. पत्रकारांवरील हल्ल्यासंदर्भात २०११ मध्ये तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच मंत्र्यांची समिती नेमली होती. राणे समितीने अहवाल सादर केला आहे. परंतु अद्याप कायदा तयार होऊ शकला नाही. हा कायदा करण्यासाठी प्रेस कौन्सिलची समिती गठित करण्यात येईल. तसेच विरोधी पक्षनेते, सभागृह नेते यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची बैठकही होईल. सर्वांच्या सूचना विचारात घेऊन महिनाभरात कायद्याचे प्रारूप तयार केले जाईल. ’
पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ वसई- विरार येथील पत्रकारांनी शुक्रवारी मुंबईतील अाझाद मैदानावर अनाेखे अांदाेलन केले.