मुंबई- नेस्ले इंडियाने मॅगीची निर्मिती करताना नियमांचे उल्लंघन केले. तसेच प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात शिसे वापरले, अशी माहिती अन्नसुरक्षा व दर्जा प्राधिकरण (एफएसएसआयए) ने उच्च न्यायालयात शुक्रवारी दिली. एफएसएसआयएने ५ जून रोजी घातलेल्या बंदीच्या आदेशाविरोधात ‘नेस्ले’ने याचिका दाखल केली आहे.
एफएसएसआयएचे मोहंमद परचा यांनी न्यायालयात सांगितले, नेस्ले इंडियाकडे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा आहे. मात्र, त्यांनी मॅगीची निर्मिती चांगल्या पद्धतीने केली नाही. तसेच ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात मॅगीत शिसे आढळले. त्यामुळेच ही बंदी घालण्यात आल्याचे परचा यांनी स्पष्ट केले.