आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue Of Seat Sharing Solved In Mumbai Cong ncp Alliance

आघाडीच्‍या जागावाटपाचा तिढा सुटला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या जागावाटपाचा तिढा सुटला आहे. वॉर्ड क्रमांक 50 कॉंग्रेसकडे तर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडे वॉर्ड 56 देण्‍यात आला आहे. याशिवाय नागपूर आणि नाशिकमध्‍येही जागावाटप अंतिम टप्‍प्‍यात आहे. तिथे लवकरच जागावाट जाहीर करण्‍यात येईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये दिली.
मुंबईत 4 जागांवरुन तिढा निर्माण झाला होता. त्‍यामुळे जागावाटपाची यादी जाहीर करण्‍यात विलंब होत होता. हा तिढा आता सुटला आहे. दोन्‍ही कॉंग्रेसमध्‍ये जागावाटपावरुन वाद निर्माण झाला होता. मुंबईत आघाडी होण्‍यावरच प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले होते. दोन्‍ही पक्षांचे नेते स्‍वबळावर निवडणूक लढण्‍याची भाषा बोलत होते. तो तिढाही सुटल्‍यानंतर आघाडी जाहीर झाली आहे.