आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • It 50 Percent Subsidy To Large Land Holder Agriculture Eknath Khadse

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाभूधारकांनाही ५० टक्के सबसिडी देणार - कृषिमंत्री एकनाथ खडसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात फळबागांसाठी अल्पभूधारकांनाच राज्य सरकार विविध कारणांसाठी सबसिडी देते. परंतु आता महाभूधारकांनाही ५० टक्के सबसिडी देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी शनिवारी दिली. १५ एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतक-यांना कुंपण बांधणे, विहिर खोदणे, रोपांची खरेदी, वीज कनेक्शन इत्यादी कामासाठी ५० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाईल. या सबसिडीचा वापर करून शेतकरी मोठ्या प्रमाणार फळबागा निर्माण करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

नेदरलँडच्या कृषिमंत्री शेरॉन दिसमा यांनी नेदरलँडमधील उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह शनिवारी मंत्रालयात खडसेयांची भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. खडसे म्हणाले, राज्यभरातील आणि जळगावमधील शेतक-यांना पूरक व्यवसाय म्हणून फुलांची शेती
करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता असून यासाठी फूल शेतीचे तंत्रज्ञान जळगावमध्ये आणण्याचा विचार राज्य सरकार करीत असून यासाठी नेदरलँडची मदत घेतली जाऊ शकते. नेदरलँड दूध आणि फुलांच्या शेतीमध्ये अग्रेसर असल्याने त्यांच्याकडील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या राज्यातील शेतक-यांसाठी करता येऊ शकेल.

शेतक-यांनी अधिक उत्पन्नाचे पीक घ्यावे
राज्यातील शेतकरी एकच पीक घेतो आणि ते पीक नैसर्गिक कारणामुळे नष्ट झाले की त्याच्यावर कर्जाचा बोझा वाढतो. त्यामुळे एकाच पिकाऐवजी आणखी एखादे शाश्वत आर्थिक उत्पन्न देणारे पीक त्याने घ्यावे. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

जळगावात सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
फळांबरोबरच फुलांच्या शेतीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जावा याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत. यासाठी जळगाव येथे नेदरलँडच्या मदतीने सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याची योजना असून शेतक-यांना फुलांच्या शेतीचे महत्त्व समजावून सांगण्यबरोबरच तंत्रज्ञानही उपलब्ध करून दिले जाईल. फुलांचा व्यवसाय मोठा असून आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप संधी आहे, असेही खडसे म्हणाले.