आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Item Girl Rakhi Sawant Contest Loksabha From Mumbai As A Independent

राखी सावंतही लोकसभेच्या आखाड्यात, वायव्य मुंबईतून निवडणूक लढविणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंतने लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. राखीने भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती मात्र तिच्या पदरी निराशा आली. तरीही तिने हार न मानता आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राखी सावंत वायव्य मुंबईतून निवडणूक लढविणार आहे.
वायव्य मुंबईतून काँग्रेसकडून गुरुदास कामत, शिवसेनेकडून गजानन किर्तीकर, मनसेचे महेश मांजरेकर, आपचे मयांक गांधी अशी चौरंगी लढत होणार आहे. आता यात राखीने उडी घेतल्याने वायव्य मुंबईतील लढत अधिक रंजक व लक्षवेधक होणार आहे. राखीने निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतल्याने मनसेच्या महेश मांजरेकरांना सर्वांत जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेनेच राखीला निवडणूक लढविण्याची फूस लावण्याची शक्यता आहे.
महिन्याभरापूर्वी राखी सावंतने दिल्ली गाठत भाजपच्या मुख्यालयात हजेरी लावली होती. त्यावेळी तिने मोदी व राजनाथ यांना भेटण्यासाठी व 'चाय पे चर्चा' करण्यासाठी आली आहे. तसेच मैं भाजप की बेटी हूं, असे सांगत पक्ष प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यावेळी राखीने मोदी आणि भाजपवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला होता. ज्या पद्धतीने मी मुंबईहून दिल्लीत आले आहे. तसेच देशातील जनतेने नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ रस्त्यावर यावे. आगामी निवडणुकीत भाजप विजयी होईल आणि मोदी देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास तिने व्यक्त केला होता. मात्र, भाजपने राखीला कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राखी भाजपवर नाराज झाली होती. अखेर तिने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. राखी अपक्ष लढत असली तरी शिवसेनेची तिला फूस असावी असे बोलले जात आहे. मराठी अभिनेते महेश मांजरेकर मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहेत. तर गजानन किर्तीकर सेनेकडून उभे आहेत. या मतदारसंघातील मराठी कलाकारांची मते मांजरेकरांना एकगठ्ठा पडली असती मात्र आता राखीने विभागली जाण्याची शक्यता आहे.
पुढे वाचा, राखीच्या डोक्यात का शिरले राजकारण...