मुंबई - राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विविध अभ्यासक्रमांसाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होत आहेत. या प्रवेशासाठीची सर्व माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या dvet.gov.in संकेतस्थळावर टाकण्यात आली असल्याची माहिती संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. आर. आर. आसावा यांनी दिली.
राज्यात सध्या 358 तालुक्यात 417 सरकारी आयटीआय आहेत. या संस्थांमध्ये दीडशेच्या वर अभ्यासक्रम शिकवले जातात, तर उर्वरित खासगी संस्थांकडून चालवण्यात येणार्या 381 संस्था आहेत. या सर्व संस्थांमध्ये दीड लाखाहून प्रवेश क्षमता आहे.