आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अायटीअाय’ देणार हमखास नाेकरीच्या संधी, कंपन्यांच्या मदतीने सरकारचा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अाैद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत (अायटीअाय) शिकून बाहेर पडले की अॅप्रेंिटसशीप, नाेकरी मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते. मात्र हे बदलण्यासाठी सरकार प्रयत्न करत अाहे. त्यासाठी अायटीअाय हे काैशल्य व्यवस्थापन अाणि राेजगार केंद्र म्हणून नावारुपाला अाणण्याचा प्रयत्न अाहे. अायटीअायमधील युवकांना काैशल्याचे धडे देतानाच त्यांना शाश्वत नाेकरी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू असून त्यासाठी खासगी कंपन्यांशी सुमारे २० सामंजस्य करार करण्यात अाले. यातून भविष्यात दहा लाख युवकांना राेजगार मिळण्याची अाशा अाहे.

‘प्लेसमेंट अाेिरएंटेड माॅडेल‘ राबविण्याचा एक भाग म्हणून रुस्तमजी पालनजी कंपनीबराेबर करार झाला अाहे. या अंतर्गत संबंधित युवकाला काैशल्य प्रशिक्षण देऊन नाेकरी देण्याची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली अाहे. अातापर्यंत टाटा ट्रस्टने शंभर अायटीअायसाेबत करार केला अाहे. महिंद्र अॅंड महिंद्रसह अाणि अाणखी काही कंपन्यांची काैशल्य विकासासाठी मदत घेण्यात येणार अाहे. या भागीदारीतून अायटीअाय विद्यार्थ्याच्या संख्येत निश्चित वाढ हाेईल असा विश्वास राज्याचे काैशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी व्यक्त केला. केंद्राने सुचविलेल्या रिटेल, कृषी, नर्सिंग, ब्युिटशियन, कृषी अशा ११ काैशल्य क्षेत्रांची अमलबजावणी राज्यातल्या ४१७ अायटीअाय संस्थांमध्ये करण्यात येणार अाहे. प्रत्येक अायटीअायला एक वििशष्ट उद्याेगक्षेत्र जाेडण्यात अाले अाहे. तरूणांना अपेक्षित प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर त्या उद्याेगाला बाजूला करून दुसरे उद्याेग तेथे जाेडले जातील.

फाेक्सवॅगन देणार काैशल्याचे धडे : पिंपरी- चिंचवड येथील अायटीअाय विद्यार्थ्यांना काैशल्याचे धडे देण्यासाठी बुधवारी काैशल्य विकास व उद्याेजकता खाते अाणि फाेक्सवॅगन इंडिया कंपनीत करार करण्यात अाला. कंपनीतर्फे दाेन वर्षात या अायटीअायमध्ये काैशल्य विकासाचे धडे दिले जातील. पहिल्या टप्प्यात दाेन हजार युवकांना काैशल्य प्रशिक्षण देण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...