आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार थेट पदवीला प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत दहावीनंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावीएेवजी थेट पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेता येणार आहे. नॅशनल अाेपन स्कूलकडून दोन विषयांची आॅनलाइन परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अायटीअाय विद्यार्थ्यांना बारावी समकक्ष करण्याचा महत्त्वाचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला अाहे. त्याबाबतचे परिपत्रक शुक्रवारी करण्यात अाले.

दहावीनंतर अायटीअाय केलेल्या विद्यार्थ्यांना बारावी समकक्ष म्हणून गृहीत धरले जात नव्हते. त्यामुळे दहावीनंतर दाेन वर्षाचा अायअायटी काेर्स पूर्ण केल्यानंतरही त्यांना थेट पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळत नव्हता. परंतु अाता काैशल्य अाणि उद्याेजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून अाता या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षा संस्थेमार्फत दाेन विषयांची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर बारावी समकक्ष म्हणून गृहीत धरले जाईल. त्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांना बीए, बीकाॅम, सायन्ससारख्या शाखा किंवा त्या समकक्ष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणे सुकर हाेणार अाहे.

केंद्र सरकारने १५ जुलै राेजी अाैद्याेगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार दहावी व बारावीचे प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग सुकर करण्याची घाेषणा केली. राज्य सरकारनेदेखील त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला अाहे.

बारावी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना २ हजार ४६० रुपयांचा डीडी ‘सेक्रेटरी, एनआयओएस’च्या नावे काढून द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांकडील सर्व कागदपत्रे आॅनलाइन सादर करावी लागणार असून दोन विषयांच्या परीक्षा शुल्काचा डीडी मात्र पोस्टाने पाठवावा लागेल. यासाठी आयटीआयमध्ये सर्व माहिती उपलब्ध अाहे. ३० सप्टेंबरपर्यंत अाॅनलाइन अर्ज करता येऊ शकतील, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी सांगितले.

१०, ११ डिसेंबर रोजी परीक्षा
परीक्षेसाठी अाॅनलाइन अर्ज केलेल्यांची हिंदी, इंग्रजी भाषेतील परीक्षा अाणि राेजगारक्षम काैशल्य अाणि उद्याेजकता परीक्षा १० अाणि ११ डिसेंबर रोजी मुंबईतील अॅडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे घेण्यात येणार अाहे.

ही कागदपत्रे अावश्यक
आयटीआयकडून मिळालेले व्यवसाय प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासबुक, दहावीची मूळ गुणपत्रिका आदी माहिती आॅनलाइन अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
बातम्या आणखी आहेत...