आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या शाही हॉटेलात डिनर करणार ट्रम्प कन्या इवांका, सलमानने येथेच केले बहिणीचे लग्न!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद स्थित ताज फलकनुमा पॅलेस जेथे इवांका ट्रम्प डिनर करेल. - Divya Marathi
हैदराबाद स्थित ताज फलकनुमा पॅलेस जेथे इवांका ट्रम्प डिनर करेल.

हैदराबाद- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका आपल्या पहिल्या भारत दौ-यावर पोहचली आहे. तिच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकन डेलिगेशन भारतात मंगळवारी पहाटे दाखल झाले. इवांका ट्रम्प हैदराबादमधील फलकनुमा पॅलेसमध्ये डिनर करेल. तिच्या भोजनासाठी वेगवेगळ्या डिशेज तयार केल्या जाणार आहेत. तसेच या डिशेज बनविण्यासाठी ताज हॉटेलमधून स्पेशल शेफ बोलावले जाणार आहेत. ज्या हॉटेलात डिनर इवांका डिनर करेल तो एक निजामचा पॅलेस होता, ज्याला आता हॉटेलात बदलले आहे. 400 वर्षाचा इतिहास आहे या हॉटेलला...

 

- हैदराबाद स्थित ताज फलकनुमा पॅलेस, हैदराबादमधील निजामाचे घर होता, जे 1894 मध्ये बनविले होते. याला ताज ग्रुपने लीजवर घेतले आहे. 
- हे हॉटेल 32 एकरात पसरले आहे, जे हैदराबादच्या 400 वर्षाचा इतिहास सांगतो. 
- ताज फलकनुमा पॅलेसला 2015 मध्ये हॉटेलियर इंडिया द्वारा बेस्ट हेरिटेज होटल डिझाईनने सन्मानित केले आहे.

 

हे आहे या हॉटेलचे खास वैशिष्ट्ये- 

 

- फलकनुमा पॅलेसमध्ये एकून 220 रूम्स आहेत. मात्र, यातील 60 रूम्सच ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सकडे आहेत. ज्यात केवळ 60 रूम आणि सुईट ताज हॉटेलमध्ये दिले गेले आहेत. यातील सर्वात महागडा लग्झरी सुईट 'ग्रॅंड रॉयल' आहे. 
- ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या जवळ 60 रूम्सपैकी डायनिंग हॉल, पॅलेस रूम्स, हिस्टोरिकल सुईट, रॉयल सुईट, ग्रॅंड रॉयल सुईट आणि ग्रॅंड प्रेसिडेंशियल सुईट आहे. 
- या पॅलेसमध्ये 101 सीट वाला डायनिंग हॉल आहे. जो सर्वात मोठा डायनिंग हॉल मानला जातो. येथे एक दरबार हॉल सुद्धा आहे ज्याची कारागिरी जागतिक दर्जाची आहे. 
- चारमीनार, मक्का मशिद, गोलकुंडा किल्ला, चौमहल्ला पॅलेस आणि रामोजी फिल्म सिटी तेथून जवळच आहे. त्यामुळे अनेक बडे बडे लोक हे हॉटेल पसंत करतात.
- येथील पाहुण्यांना विन्टेज घोडा गाडीत रिसीव केले जाते. येथे येणा-या लोकांसाठी रॉयल स्पा रूम्स, भोजनासाठी अनेक इंटरनॅशनल डिशेज, 6 वेगवेगळ्या सुविधासह रूम्स, प्रायवेट स्विमिंग पूल आदी सुविधा आहेत. 

 

येथेच झाली होती सलमान खानच्या बहिणीचे लग्न- 

 

- सलमान खानची बहिण  अर्पिताचे लग्न येथेच फलकनुमा पॅलेसमध्ये झाले होते. 
- लग्नात आलेल्या पाहुण्यांना जगातील सर्वात मोठ्या डायनिंग टेबलवर 32 प्रकारचे हैदराबादी पदार्थ ठेवले होते. 
- या लग्नात आमीर खान, कॅटरीना कैफ, प्रियंका चोप्रा, ऋतिक रोशन, दीपिका पादुकोण, सैफ अली खान, करीना, धर्मेंद्र, हेमामालिनी, मिका आणि हनी सिंग उपस्थित होते. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फलकनुमा पॅलेसच्या आतील फोटोज......

बातम्या आणखी आहेत...