आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे.डे. यांनी लिहीलेल्‍या पुस्‍तकात असे काय होते की, राजनने घडवून आणली हत्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे हत्‍या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. जे.डे. यांनी गुन्हेगारी जगतावर लिहिलेल्या पुस्तकामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने त्यांची हत्या केल्याचा दावा करणारे आरोपपत्र सीबीआयने शुक्रवारी विशेष न्यायालयात सादर केले आहे. या हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या यादीतील साक्षीदार रवी राम यालाही सीबीआयच्या आरोपपत्रात दोषी ठरवण्यात आले आहे. या आरोपपत्रात राजनसह इतर आरोपींवर खून, खूनाचा कट, शस्त्र प्रतिबंधक कायदा व मोक्का अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
11 जून 2011 रोजी जे. डे. यांची पवई येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या राजनच्या सांगण्यावरून झाली असा दावा करत, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना वोरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरूण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ व दिपक सिसोडीया यांना अटक करून आरोपपत्रही दाखल केले होते.
- पत्रकार जे. डे. यांनी राजनविरोधात कित्‍येक बातम्‍या दिल्‍या होत्‍या.
- जे.डे. यांनी एक पुस्‍तक लिहीले होते त्‍यामध्‍ये राजन कसा वाईट हे सांगण्‍यात आले होते.
- जे.डे. यांच्‍या पुस्‍तकात राजनचा प्रतिस्‍पर्धी दाऊदचे कौतूक करण्‍यात आले होते.
- हीच बाब अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला खटकली होती.
- त्‍यानंतर राजनने पत्रकार जे.डे. यांच्‍या हत्‍येचा कट आखला.
- पवईमध्‍ये जे.डे. यांच्‍या घराजवळ चार दुचाकीस्‍वारांनी त्‍यांच्‍यावर गोळीबार केला होता.
- सीबीआयने चार्जशीटमध्‍ये सांगितले की, जे. डे. दोन पुस्‍तके लिहीत होते.
- त्‍यामध्‍ये गल्‍लीबोळातील गुंड श्रीमंत कसे झाले याची कथा त्‍यांनी लिहीली होती.
बातम्या आणखी आहेत...