आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • J Dey Murder Case: Mumbai Police Files Chargesheet

जेडे हत्याकांड; जिग्नासह १० जणांवर आरोप निश्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध गुन्हे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने पत्रकार जिग्ना व्होरा हिच्यासह दहा जणांवर सोमवारी आरोप निश्चित केले. विशेष न्यायमूर्ती ए. एल. पानसरे यांनी सर्वांवर लावण्यात आलेले आरोप वाचून दाखवले. जेडे हत्याकांड हे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीने घडवून आणले होते. यासाठी व्होरासह नऊ जणांनी माहिती पुरवली होती. जून २०११ मध्ये डे यांची पवई येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. डे यांनी छोटा राजनविरोधात वृत्तपत्रातून लेख मालिका चालवली होती. त्यामुळे राजनने डे यांना संपवण्याचा कट रचला होता. डे यांचा गुन्हे पत्रकारितेत दबदबा होता. जिग्ना व्होरा हिलाही गुन्हे पत्रकारितेत नाव मिळवायचे होते. त्यामुळे तिने डे यांच्याबाबतची सर्व माहिती राजन टोळीला पुरवली होती. तिने दिलेल्या माहितीआधारे राजन टोळीने डे यांचा खून केला. दरम्यान, याप्रकरणी व्होरा हिच्याविरोधात वेगळे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २०१२ मध्ये तिला जामीन मंजूर करण्यात आला होता. डे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तीन हजार ५५ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.