आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जादूटोणाविरोधी विधेयकातील तरतुदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या विधेयकात नमूद केलेल्या गुन्ह्यांबद्दल कमीत कमी सहा महिने आणि पाच हजार रुपये दंड ते जास्तीत जास्त ७ वर्षे कारावास आणि 50 हजार रुपये दंड अशी तरतूद आहे. त्याशिवाय इतर कलमे अशी :
1) भूत उतरविण्याच्या बहाण्याने बांधून मारहाण, छळ, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील. (भूत उतरविण्यासाठी मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा नाही.)
2) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल.
3) जिवाला धोका अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणे हा गुन्हा.
4) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे.
5) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे हा गुन्हा असेल, परंतु केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही.
६) एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे हा गुन्हा.
७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण, नग्न धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.
८) भूत पिशाचांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती, भुताच्या कोपामुळे शारीरिक इजा झाली, असे सांगणे.
९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे.
10) बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा, गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे.
11) विशेष शक्ती असल्याचे सांगून, गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून लैंगिक संबंध ठेवणे. अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्वासन देत लैंगिक संबंध ठेवणे.
12) मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्याचा धंदा, व्यवसायासाठी वापर करणे हे गुन्हा ठरेल.