आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jadu Tona Ordinance Implemented, Governor Shankar Narayan Signed On Th Bill

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जादूटोणाविरोधी कायदा लागू, राज्यपाल शंकरनारायणन यांची वटहुकुमावर स्वाक्षरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जादूटोणाविरोधी कायदा शनिवारपासून राज्यात लागू झाला. सरकारने पाठवलेला वटहुकुमाचा मसुदा मंजूर करून राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यावर सही केली. सहा महिन्यांत सरकारला हा कायदा विधिमंडळात मंजूर करावा लागेल.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सरकारने जादूटोणाविरोधी वटहुकुमाचा निर्णय घेतला होता. 7 जुलै 1995 रोजी आमदार पी. जी. दस्तुरकर यांनी जादूटोणाविरोधी कायदा विधिमंडळात मंजूर व्हावा म्हणून सर्वप्रथम मांडला होता. विधानसभेत तेव्हा तो 26 विरुद्ध सात मतांनी पारित झाला होता. मात्र त्यानंतर आजपर्यंत त्यात दुरुस्त्या करण्यात येत होत्या. आजवर त्यात 20 वेळा दुरुस्त्या करून 18 वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी होत नव्हती. ‘महाराष्ट्र नरबळी अमानुष, अघोरी आणि अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन करणारे विधेयक 2013’ या नावाचा हा कायदा राज्यभरात लागू झाला आहे.

6 महिन्यांत मंजुरी आवश्यक
शुक्रवारी वटहुकुमाचा मसुदा राज्यपालांकडे पाठवला होता. राज्यपालांनी शनिवारी मसुदा वाचून तो मंजूर केला आहे. राज्यपालांच्या सहीनंतर हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली होती. सहा महिन्यांत जर राज्य सरकारने हा कायदा मंजूर केला नाही तर राज्यपालांकडे वटहुकूम काढण्यासाठी पुन्हा पाठवावा लागेल.