आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव-जयदेवमधील संपत्तीचा वाद लवकरच मिटेल- चंदूमामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाळासाहेब ठाकरेंच्या सुमारे 100 कोटींच्या संपत्तीवरून उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे या बंधूंत सुरु झालेला न्यायालयीन वाद लवकरच संपेल. संपत्तीवरून या दोघांत काही गैरसमज झाले आहेत ते मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. हा कौटुंबिक वाद असून, तो माध्यमांत व कोर्टात गेल्याचे दु:ख झाले असे मत या उद्धव-जयदेव यांचे मामा चंद्रकांत वैद्य (चंदूमामा) यांनी व्यक्त केले आहे.
ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मला जे काही करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. उद्धव आणि जयदेव यांच्यात काही गैरसमज झाले आहेत. ते गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न करीन. याआधीही कोर्टाच्या बाहेर बसून आम्ही या विषयावर चर्चा केली होती. मात्र जयदेव याने माघार घेतली नाही. मात्र, यावर लवकरच तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न आहे.
चंदूमामा हे बाळासाहेबांची पत्नी मीनाताई ठाकरे यांचे बंधू आहेत. चंदूमामांनी याआधी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राज-उद्धव यांचे कौटुंबिक संबंध सुरु झाले. मात्र या दोघांत अद्यापही राजकीय वर्चस्वावरून लढाई सुरु आहे. आता चंदूमामांना उद्धव आणि जयदेव यांच्यातील वाद सोडविण्यात यश येते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
उद्धव आणि जयदेव यांच्यात काय आहे वाद, वाचा पुढे...