आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jail Officers Get Salary Like Police, Home Minister Ram Shinde Announcement

जेल अधिका-यांना पोलिसांप्रमाणे वेतन, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यातील कारागृह अधिकारी आणि कर्मचा-यांना पोलिस विभागातील अधिकारी
व कर्मचा-यांप्रमाणेच मानधन आणि भत्ते देण्याबाबत शासन सकारात्मक आहे.
राज्यातील कारागृह व्यवस्थेबाबत आढावा घेतला जात असून आवश्यक असणा-या
पायाभूत सुविधा आणि निधी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे मत गृहराज्यमंत्री राम
शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

कारागृह विभागातर्फे आयोजित केलेल्या दौलतराव जाधव तुरुंग प्रशिक्षण महाविद्यालयाच्या दीक्षांत संचलन समारंभात ते बोलत होते. अपर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर, उपमहानिरीक्षक स्वामी साठे, कारागृह अधीक्षक योगेश देसाई उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, पोलिसांना सुटीच्या दिवशी कामावर बोलावले जाते. पूर्वी त्यांना त्यासाठी जो भत्ता मिळत होता त्यामध्ये आता भरीव वाढ करण्यात आली आहे. या वाढीप्रमाणेच कारागृह कर्मचा-यांनाही वेतन व मानधन देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. कुटुंब विमा योजना, एक पदोन्नती, गणवेशाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल.
मुंबईतील आर्थर कारागृहावर येणारा ताण लक्षात घेता मानखुर्द येथे आणखी एक
कारागृह उभारण्याचा विचार आहे. पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास प्राधान्य दिले
जाईल. येरवडा कारागृह, तुरुंग कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, खुले कारागृह आणि महिला
कारागृह अशा चार महत्त्वपूर्ण संस्था असून त्यांना रुग्णवाहिका देऊ, असे शिंदे म्हणाले.