मुंबई- मांसविक्री बंदीच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना आता या वादात जैन मुनींनी उडी घेतली आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुंबई आमचीच, अशा भाषा करत जैन मुनी आचार्य सागरचंद्र सागर सुरेशवर्जी यांनी शिवसेना-मनसेला प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर ठाकरे बंधु अर्थात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या टिकेनंतर मांसबंदीसाठी भाईंदरमधील जैन समाजाने उपवास आंदोलन सुरु केले आहे.
मांसविक्री बंदीच्या निर्णयावर ठाकरे बंधूंनी भाजप आणि जैन समाजावर टीका केली होती. त्यावरून जैन धर्मिय रस्त्यावर उतरले आहे. भाईंदरमध्ये तब्बल 10 हजार जैन साधूंनी शांततेत आंदोलन करत आपला निषेध व्यक्त करत आहे.
जैनमुनींची उडी...
'जरा इतिहास उघडून बघा, असे सांगत मुंबईच्या विकासात गुजराती आणि जैनाचे मोठे योगदान आहे, असे सागरचंद्र सागर सुरेशवर्जी यांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे पाकिस्तान स्वतंत्र देश बनल्यानंतर मुस्लिमांना भारताबाहेर बाहेर टाकले का? असा सवाल देखील जैन मुनींनी यावेळी उपस्थित केला. शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे जैन बांधवांच्या भावना दुखावल्या आहे.
मांसबंदींसाठी भाईंदर येथील जैन मैदानावर शनिवारी जैन समाज एक दिवसीय उपवास आंदोलन करत आहेत. यात जैन मुनींसह 10 हजारांहून अधिक बांधव सहभागी झाले आहेत.
पुढीलवर वाचा, काय म्हणाले होते राज ठाकरे....