आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयप्रकाश चौकसे यांना सुब्रह्मण्यम भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा सुब्रह्मण्यम भारती हिंदी सेतू विशिष्ट सेवा पुरस्कार जयप्रकाश चौकसे यांना जाहीर झाला आहे. 51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून 30 जुलै रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित एका समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल. महाराष्टÑाचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील. जयप्रकाश चौकसे मागील 20 वर्षांपासून ‘दैनिक भास्कर’मध्ये स्तंभलेखनाचे कार्य करत आहेत. महात्मा गांधी और सिनेमा, दराबा व ताज, बेकरारी का बयान या त्यांच्या कादंबºया प्रसिद्ध आहेत. भास्कर समूहात प्रकाशित ‘परदे के पीछे’ या त्यांच्या स्तंभाचे संकलन असलेले पुस्तकही प्रकाशित झाले आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्यांचे दर्शन घडवणारा त्यांचा हा स्तंभ त्यांच्या साहसिक विचारांसाठी प्रसिद्ध आहे.