आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जीएसटी'च्या विरोधावरून जेटली काँग्रेसवर भडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वस्तू व सेवाकर विधेयक (जीएसटी) राज्यसभेत मंजूर होत नसल्याचा ठपका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर ठेवला आहे. काँग्रेसचे नाव न घेता जेटली म्हणाले, काही लोक सत्तेत होते तेव्हा अर्थव्यवस्थेसाठी अडसर ठरत होते. आता विरोधी पक्षात असतानाही ते
असेच करत आहेत.

येथे एका कार्यक्रमात बोलताना जेटली म्हणाले, बहुतांश मुख्यमंत्री जीएसटीच्या बाजूने आहेत. विरोधी पक्षातील मुख्यमंत्रीही जीएसटी लागू व्हावा या मताचे आहेत. यामुळे देशात आर्थिक ऐक्य निर्माण होईल. संपूर्ण देश एक बाजार म्हणून उदयास येईल. जेटली म्हणाले, संसदेत हे विधेयक रोखण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे संसदेचे कामकाजच रोखण्याची रणनीती ते आखत आहेत. १ एप्रिल २०१६ पासून देशात जीएसटी लागू व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे. लोकसभेत हे विधेयक गेल्या आठवड्यात मंजूर झाले आहे. या महत्त्वपूर्ण विधेयकासह भूसंपादन विधेयक राज्यसभेत मंजूर व्हावे यासाठी सरकारने राज्यसभेच्या अधिवेशनाचा कालावधी तीन दिवसांनी वाढवला आहे. राज्यसभेत एनडीए आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नाही.

बदल अर्थव्यवस्थेच्या
हिताचे नाहीत : मनमोहन

जीएसटी विधेयकात सरकारने अनेक बदल केले आहेत. त्यामुळे हे विधेयक पुन्हा विचार करण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले गेले पाहिजे, असे मत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केले आहे. मनमोहनसिंग म्हणाले, मी विधेयकाच्या िवरोधात नाही; परंतु यात नवे मुद्दे जोडण्यात आले असून करण्यात आलेले काही बदल अर्थव्यवस्थेसाठी योग्य नाहीत. मनमोहनसिंग यांनी या वक्तव्यातून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता केवळ तीन दिवसांचे कामकाज बाकी आहे. सोमवार ते बुधवारपर्यंत जीएसटी विधेयक राज्यसभेत मंजूर व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे; परंतु कॉँग्रेससह इतर िवरोधी पक्ष हे विधेयक स्थायी समितीकडे विचारार्थ पाठवण्यावर अडून बसले तर हे विधेयक या सत्रात मंजूर होण्याची शक्यता कमी आहे.
अर्थ मंत्रालय व रिझर्व्ह बँकेमध्ये िदसत असलेल्या मतभेदांवर सिंग म्हणाले, दोघांनी मिळून काम केले पाहिजे. मी आरबीआयमध्ये काम केले आहे. त्याचे महत्त्व मी जाणतो. त्यांची स्वायत्तता अबाधित राहिली पाहिजे.
त्यामुळे दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य असले पाहिजे, असे आपल्याला वाटते.
बातम्या आणखी आहेत...