आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Gharkul Scam Issue MLA Suresh Jain In JJ Hospital

आमदार सुरेश जैन हे सामान्य कैदी; मीरा बोरवणकर यांचे \'जेजे\' प्रशासनाला पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/मुंबई- जळगाव येथील कथित घरकुल गैरव्यवहारातील संशयित आरोपी आणि शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना सामान्य कैद्यांचे नियम लावावेत. तसेच त्यांना जे.जे. रुग्णालयातील जेलवार्डमध्ये ठेवण्यात यावे, असे कारागृहाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी 'जेजे' प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सुरेश जैने गेल्या आठ महिन्यांपासून सेंट जॉर्ज रुग्णालयातील नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहे. यापूर्वीही यांनी सतत सरकारी व खासगी रुग्णालयात मुक्काम ठोकला होता. परंतु जैन यांना सामान्य कैद्यांचाच नियम लागू करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

दुसरीकडे, सुरेश जैन, राजा मयूर आणि जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जांवर सोमवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. न्यायमूर्ती पी. व्ही. नलावडे यांनी तिघांचे अर्ज फेटाळून लावले. विशेष न्यायालय, खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयात आजवर नऊ वेळा आमदार जैन यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. घोटाळ्यातील फिर्यादी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यावर दाखल केलेला गुन्हा, तपासाधिकारी इशू सिंधु यांना दिलेली धमकी, मयूर आणि वाणी यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम अपहाराची नसून ती इतर ठिकाणी झालेल्या व्यवहाराची आहे, असे खोटे प्रमाणपत्र मयूर आणि वाणी यांनी न्यायालयात सादर केले होते. ते सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.