आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalna Agriculture Centre Get Vasantrao Naik Award

जालन्याच्या कृषी केंद्राला वसंतराव नाईक पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणा-या वसंतराव नाईक कृषी पुरस्काराचे पहिले 51 हजार रुपयांचे सामाईक पारितोषिक जालना येथील कृषी विज्ञान केंद्राला जाहीर करण्यात आले आहे. 1 जुलै रोजी मुंबईत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहाणार आहेत. 21 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.


प्रतिष्ठानचे सचिव विनयकुमार पटवर्धन यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पना राबवणा-या शेतक-यांना आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कारांच्या रकमेत यंदापासून वाढ करण्यात आली आहे. यंदा मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ असतानाही अनेक शेतक-यांनी त्यावर मात करण्याची किमया दाखवली आहे. त्यामुळे यंदाच्या पुरस्कारांवर दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांचा वरचष्मा असल्याचे दिसून येते.


पुरस्काराचे मानकरी
राजशेखर पाटील (लातूर)- वसंतराव नाईक फलोत्पादन, सुरेश खानापूरकर (धुळे)- जलसंधारण, डॉ. नितीन मार्कंडेय (परभणी)- कृषी साहित्य, नीलकंठ भोगले (सोलापूर)- कृषी प्रक्रिया, संजय येऊल (अकोला)- भाजीपाला उत्पादन, गोपाळ मेखले (लातूर)- फुलशेती , अमित पडोळ (नाशिक)- कृषी उत्पादन निर्यात.