आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांची बदली रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन पेटलेले असताना, ही बदली रद्द करण्याऐवजी राज्य सरकारने तीन दिवसांपूर्वी जालन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून झालेली बदली अचानक रद्द केली आहे. आता ते उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतील. बदल्यांचे आदेश काढायचे आणि राजकीय दबाव आला की त्यात एक तर बदल करायचा किंवा रद्द करायचे, असा पोरखेळ राज्य सरकारने लावल्याचे यावरून दिसून येते.
राज्य सरकारने सोमवारी सात नव्या बदल्यांचे आदेश काढले. राधाकृष्णन यांना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केल्याने ही बदली रद्द झाली की आणखी काही राजकीय कारणामुळे हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. परदेशी यांच्या बदलीच्या आदेशासोबतच राधाकृष्णन यांचा बदली आदेशही जारी करण्यात आला होता. आता परदेशींचीही बदली रद्द होईल का, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे.
सात फेब्रुवारीस राज्य सरकारने काही सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात यापूर्वी तीन फेब्रुवारीस काढलेल्या आदेशातील काही बदल्या रद्द करून संबंधित अधिकार्यांच्या चारच दिवसात नवीन ठिकाणी नेमणुका केल्या होत्या. तीन फेब्रुवारीला यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आलेल्या प्रेरणा देशभ्रतार यांना जुने आदेश रद्द करून सात फेब्रुवारी रोजी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले होते. तसेच चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झालेले मंत्रालयातील उपसचिव मल्लिनाथ कलशेट्टी यांची चारच दिवसांत यवतमाळच्या सीईओपदी बदली करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.