आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार vs शिवजलक्रांती; सेना-भाजपमध्ये पुन्हा भडकले वाक‌्युद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- या आधी दुष्काळग्रस्त भागात उपाययाेजनेवरून फडणवीस सरकारवर टीकेची झाेड उठविल्याबद्दल अाता चांगला पाऊस पडल्यानंतर मराठवाड्यातील जलसंधारणाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून सत्ताधारी शिवसेना- भाजपमध्ये वाद निर्माण झाला अाहे.

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवारपेक्षा अामची शिव जलक्रांतीची कामेच जनतेच्या फायद्याची ठरली, असा दावा शिवसेनेकडून केला जात अाहे. दरम्यान, ‘उद्या पाऊसही अाम्हीच पाडला असा दावा हे लाेक करतील,’ असा टाेला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेनेचे नाव घेता लगावला.

दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे भूम- परंडा तालुक्यातील नदी, नाले, अाेढे वाहू लागले अाहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ‘दुष्काळ पडला असताना फक्त ठणाणा नाही करत बसलो. दुष्काळी भागात शिवसेनेने शिवजलक्रांतीची भरीव कामे केली. अाता त्याचा चांगला फायदा हाेत अाहे. दुष्काळी भागातून मला काही फाेन अाले. आमच्या गावाचा संपर्क गावांशी तुटलाय एवढा पाऊस झालाय. आनंद आहे एवढे वर्ष आम्ही पाणीच पाहिले नव्हते. शिवसेनेच्या शिवजलक्रांतीमुळे आमच्या गावात पाणी आलेय, अशा भावना लाेक व्यक्त करत अाहेत.’ शिवजलक्रांती योजनेमुळे मराठवाड्यात पाणी साठलं हे काम शिवसेनेचं आहे. मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही, पण जे काम शिवसेनेने केलंय ते आम्ही सांगणारच. मी शनिवारी उस्मानाबादला जाऊन या कामाची पाहणी करणार अाहे, असेही ते म्हणाले. शिवसेना आमदार अर्जुन खाेतकर यांनीही हे शिवसेनेच्या कामाचेच यश असल्याचा दावा केला. जलयुक्त शिवारच्या अाधीपासून अामची शिवजलक्रांती याेजना कार्यान्वित असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...