आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते जनार्दन परब यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अजब न्याय वर्तुळाचा, हमिदाबाईची कोठी अशा दर्जेदार नाटकांसह अवध्य, नटीच्या लग्नाला, रात्र थोडी सोंगं फार, काका किशाचा, संगीत विद्याहरण, मुद्राराक्षस अशा लोकप्रिय नाटकांमध्ये काम करणारे अष्टपैलू अभिनेते जनार्दन परब (७५) यांचे शनिवारी जोगेश्वरी येथे त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. नाटकांसह चित्रपट, टीव्ही मालिका असा प्रवास करणाऱ्या परब यांनी तब्बल चार दशके अभिनयाचा प्रवास केला. नाटकांवर विशेष जीव असलेल्या परब यांनी दिवंगत अभिनेते मच्छिद्र कांबळी यांच्याबरोबर एकापेक्षा एक सरस मालवणी नाटके करत रंगभूमी गाजवली होती.
त्यांनी धूमशान, नशिबान घोव खावचो, कबूतरखाना अशा प्रसिद्ध मालवणी नाटकांमध्येही प्रमुख भूमिका केल्या होत्या. नाटक तसेच चित्रपट दिग्दर्शनाचीही जबाबदारी परब यांनी यशस्वीपणे सांभाळली. क्रांतिवीर, बाजीगरसह शिकारी, ऐलान, जिद्दी, नायक, गुलाम, उडान, चायना गेट अशा हिंदी चित्रपटांमध्ये परब यांच्या भूमिका लांबीने कमी असल्या तरी प्रभावी ठरल्या होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.