आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janhit Shetkar Sanghtana Leader Prabhakar Deshmukh Strike Sold

गाढवाचे लग्न लावून भय्या देशमुखांच्या उपोषणाची सांगता!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उजनी धरणाचे पाणी डाव्या व उजव्या कालव्यात सोडावे, या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या सोलापूरच्या जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे बुधवारी सूप वाजले. तब्बल 121 दिवस चाललेल्या या प्रदीर्घ आंदोलनाची सांगता गाढवाचे लग्न लावून झाली. या वेळी सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

उजनी धरणाच्या पाण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर ऊर्फ भय्या देशमुख यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी मुंबईत 5 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील सभेत या आंदोलकांची खिल्ली उडवल्यामुळे हे आंदोलन चर्चेत आले होते. 9 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने उजनी धरणात पाणी सोडावे, असे आदेश शासनाला दिले होते. आंद्रा आणि भामा आसखेड धरणातील पाणी सोडून प्रशासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी केली. मात्र उजनीत हे पाणी पोचायला 42 दिवस लागल्यामुळे हे पाणी उजव्या व डाव्या कालव्यात सुटू शकले नाही.

कॉलेजच्या मैदानात गाढवाचे लग्न
बुधवारी गाढवाचे लग्न लावून आंदोलनाची सांगता होणार होती. परंतु या लग्नास पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे दादर येथील पोद्दार कॉलेजच्या मैदानात गाढवाचे लग्न पार पडले. लग्नाला उपस्थित असणाºया 100 शेतकर्‍यांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आणि काही काळाने सोडून दिले.