आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधींनी समतोल गमावला जावडेकर यांचा टोला, सुषमा स्वराज यांच्यावरील टीकेला उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांच्यावर सतत टोकाची टीका करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी समतोल गमावला आहे. लोकसभेत मोठा पराभव सहन करावा लागल्याने काँग्रेस अजून पराभवाच्या मानसिकतेमधून बाहेर आली नाही हेच यामधून सिद्ध होते, अशी टीका केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी केली.


काँग्रेसला संसद चालवायची नाही आणि त्यांनी हे आधीच ठरवले होते. काँग्रेसप्रणीत यूपीएने आधीच देशाला अधोगतीच्या खाईत लोटले असून आताही त्यांना देश पुढे जावा असे वाटत नाही. अन्यथा त्यांनी संसदेचे कामकाज रोखले नसते. काँग्रेसला संसदेपेक्षा आपण मोठे असल्याचे वाटत असून काम ठप्प झाल्याने जनतेच्या पैशांचा चुराडा होत असल्याचे त्यांना सोयरसुतक दिसत नाही, असे जावडेकर म्हणाले.
भूमी अधिग्रहण कायद्याविषयी भाजप सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी बिल कोणत्याही परिस्थितीत सरकार आणणारच आणि ते एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात येईल. यामुळे देशाच्या करप्रणालीत मोठे बदल होऊन त्याचा मोठा फायदा देशातील जनतेला होईल. मात्र, काँग्रेसला काही करायचे नाही. कोणी काही वेगळे आणि देशाच्या फायद्याचे करत असेल तर त्यांना करू द्यायचे नाही, असे मत जावडेकर यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...